ShivSena: ते पाप माझ्या हातून होणार नाही-मी न्यायालयात जाणार ! व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांची प्रतिक्रिया


  • शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा, या ऑडिओ क्लिपद्वारे केला जात आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा, या ऑडिओ क्लिपद्वारे केला जात आहे. मात्र रामदास कदम यांनी ही क्लिप आपली नसून, आपला आवाज वापरला जात असल्याचा दावा केला आहे.ShivSena: Ramdas Kadam’s reaction after the viral audio clip

विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा टाकलेला आहे. प्रसाद कर्वेसोबत माझा कुठलाही संबंध नाही. किरीट सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. उलटपक्षी जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे.

त्या दोघांनी मिळून हे केलं की काय? असं मला वाटत आहे. अनिल परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा मुलगा तिथे आमदार आहे. संजय कदम यांना पाडून तो आमदार बनलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. हे पाप आहे. ते माझ्या हातून घडणार नाही.

खोट्या क्लीप व्हायरल करुन मला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले होते. रामदास कदम बोलल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळते.
याच्याआधीही माझी बदनामी झाल्याचा दावा मी ठोकलाय. आता पुन्हा मी न्यायालयात जाणार आहे.

किरीट सोमय्या यांच्याशी आमचा दुरान्वयेही संबंध नाही. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील अशा क्लीप व्हायरल करुन बदनाम केलं गेलंय. मी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन मंत्रीपद स्वीकारणार नाही, असं जाहीर केलं होतं. माझी कोणतीही नाराजी नाही.

खोट्या क्लीप बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणावरुन मी कदाचित एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना भेटू, असं रामदास कदम म्हणाले.

 

ShivSena: Ramdas Kadam’s reaction after the viral audio clip

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात