Bank Timing in Corona Crisis : बँकांच्या कामाच्या वेळेत मोठा बदल, फक्त एवढ्याच कामांना मुभा, वाचा सविस्तर…

Bank Timing in Corona Crisis Changed in States, read details

Bank Timing in Corona Crisis : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू आहेत. महाराष्ट्रातही 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या कोरोना संकटाच्या काळात बँकांच्या वेळेतही मोठा बदल करण्यात आला आहे. राज्यात आता बँकांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत चेक क्लिअरन्सचे काम होणार आहे. हे नवीन बदल शुक्रवार 23 एप्रिलपासून अंमलात येतील. Bank Timing in Corona Crisis Changed in States, read details


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू आहेत. महाराष्ट्रातही 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या कोरोना संकटाच्या काळात बँकांच्या वेळेतही मोठा बदल करण्यात आला आहे. राज्यात आता बँकांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत चेक क्लिअरन्सचे काम होणार आहे. हे नवीन बदल शुक्रवार 23 एप्रिलपासून अंमलात येतील. तत्पूर्वी, उत्तर प्रदेशात बँका उघडण्याची व बंद करण्याची वेळ बदलली आहे. तथापि, ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. बँक ग्राहकांना आपल्या बँकेच्या अॅपच्या माध्यमातून अनेक कामे करता येणे शक्य आहे.

कामाचे तास तीन

बँक संघटना UFBU ने आयबीएला पाठवलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, प्रत्येक बँकेत कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाच्या घटना वाढत आहेत, आधीच रुग्णालयांत बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कामकाजाचे तास कमी करून दररोज तीन तास केले जावेत आणि अनेक सेवांवर वगळण्यात याव्यात. यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकेल.

बँकेत एवढ्याच कामांना मुभा

दुसरीकडे, उत्तर प्रदेशात सर्व बँका आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सामान्यांसाठी खुल्या असतील. ग्राहकांना बँकांमध्ये फक्त किमान सेवाच मिळू शकणार आहेत. यामध्ये रोख रक्कम जमा करणे, पैसे काढणे, चेक क्लिअरिंग, सरकारी व्यवहार आणि इतर व्यवहार यांचा समावेश असेल. एका वेळी फक्त 50 टक्के कर्मचार्‍यांना बँकेत उपस्थितीची परवानगी आहे. उर्वरित बँक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. याशिवाय बँकेतील करन्सी चेस्ट, एटीएम, सुरक्षा, डेटा ऑपरेशन, सायबर सुरक्षा, क्लिअरिंग हाऊस, बँकेच्या तिजोरीशी संबंधित सर्व कामे सामान्यपणे सुरू राहतील. 22 एप्रिल ते 15 मे या कालावधीत हे नियम लागू आहेत. सरकारी सूचनेनंतर याच्या मुदतीत वाढही होऊ शकते.

आयबीएच्या बैठकीत निर्णय

भारतीय बँक असोसिएशनने (IBA) बँक कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (एसएलबीसी) संयोजकांना सांगितले की, कोरोनाची स्थिती व आवश्यकतेनुसार बँक शाखांच्या प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) मध्ये सुधारणा करू शकता. 21 एप्रिल रोजी आयबीएच्या विशेष व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला.

Bank Timing in Corona Crisis Changed in States, read details

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात