‘जिथे कमी तिथे आम्ही’ : ऑक्सिजनसाठी कॉर्पोरेट- सरकारी कंपन्यांचा पुढाकार, टाटा-रिलायन्ससह अनेक कंपन्या मैदानात

Corporate-government Companies initiatives For oxygen Supply in India including Tata-Reliance

Oxygen Supply : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांनी आता सकारात्मक पुढाकार घेतला आहे. रिलायन्स, टाटा स्टील, सेल, जिंदल स्टील यांनी कोविडच्या उपचारांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर सहकारी संस्था इफ्कोने ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. येथून रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन पुरविला जाईल. Corporate-government Companies initiatives For oxygen Supply in India including Tata-Reliance


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात प्रामुख्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांनी आता सकारात्मक पुढाकार घेतला आहे. रिलायन्स, टाटा स्टील, सेल, जिंदल स्टील यांनी कोविडच्या उपचारांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर सहकारी संस्था इफ्कोने ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. येथून रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन पुरविला जाईल.

कोरोना विषाणूने गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. देशभरात मेडिकल ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे.

टाटा स्टीलने पुरवठा सुरू केला

टाटा स्टील ही टाटा समूहाची स्टील कंपनी दररोज 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरवत आहे. रविवारी कंपनीने ट्विट केले की, देशाची गरज लक्षात घेऊन आम्ही ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. हा पुरवठा विविध राज्य सरकारे व रुग्णालयांमध्ये केला जात आहे.

रिलायन्सकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन

यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने महाराष्ट्र सरकारला 100 टन ऑक्सिजन पाठविला आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने गुजरातमधील आपल्या रिफायनरीतून 100 टन ऑक्सिजन महाराष्ट्र सरकारकडे पाठविला होता. मुकेशच्या अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) जामनगरमध्ये असलेल्या दोन ऑइल रिफायनरीजमधून महाराष्ट्रासाठी ट्रकमधून 100 टन ऑक्सिजनची वाहतूक केली आहे.

इफ्कोतर्फे ऑक्सिजन प्लांटची उभारणी

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता इफ्को या खत निर्मिती व विक्री करणार्‍या सहकारी संस्थेने चांगले पाऊल उचलले आहे. इफ्को गुजरातमधील कलोल येथील कारखान्यात दर तासाला 200 घनमीटर उत्पादन क्षमता असणारा ऑक्सिजन प्रकल्प स्थापित करत आहे. इफ्को रुग्णालयांना ऑक्सिजन विनामूल्य देणार आहे. या कारखान्यातून तयार झालेल्या ऑक्सिजन सिलिंडरमध्ये 46.7 लिटर ऑक्सिजन असेल.

सेलकडून 33 हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा

देशातील सर्वात मोठी स्टील निर्माता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच सेलने सुमारे 33 हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, या ऑक्सिजनचा उपयोग कोरोनामुळे पीडित रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला गेला आहे. सेलने म्हटले की, बोकारो (झारखंड), भिलाई (छत्तीसगड), राउरकेला (ओडिशा), दुर्गापूर आणि बर्नपूर (पश्चिम बंगाल) या स्टील प्लांटमधून हा ऑक्सिजन पुरविला गेला आहे.

जिंदल स्टीलतर्फेही ऑक्सिजनचा पुरवठा

जिंदल स्टील प्रायव्हेट लिमिटेड (जेएसपीएल) देखील आपल्या अंगुल (ओडिशा) आणि रायगड (छत्तीसगड) रिफायनरींमधून दररोज 50 ते 100 टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. हा ऑक्सिजन गुजरातेतील आरोग्य संस्थांना दिला जात आहे.

विशेष म्हणजे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उद्योगांसाठी ऑक्सिजन वापरास बंदी घातली आहे. रविवारी संध्याकाळी केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार आता केवळ 9 अत्यावश्यक उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा सुरू राहणार आहे.

1. टाटा स्टीलतर्फे दररोज 200 ते 300 ऑक्सिजनचा पुरवठा.
2. जिंदल स्टीलतर्फे दररोज 185 टन ऑक्सिजनचा पुरवठा.
3. आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टीलतर्फे दररोज 200 टन ऑक्सिजनची निर्मिती
4. सेलतर्फे आतापर्यंत 33,300 टन ऑक्सिजनची निर्मिती.
5. वेदांतातर्फे त्यांच्या स्टरलाइट कॉपर प्लांटमधून ऑक्सिजन पुरवठ्याची ऑफर.
6. रिलायन्सतर्फे दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा.
7. विझाग स्टील प्लांटच्या RINL युनिटतर्फे आतापर्यंत 8,842 टन ऑक्सिजनची निर्मिती.
8. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे 150 मेट्रिक टन ऑक्सिजनचा रुग्णालयांना पुरवठा.
9. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे रुग्णालयांना 100 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा.
10. IFFCO तर्फे पुढच्या 15 दिवसांत 4 ऑक्सिजन प्लांटची उभारणी.

Corporate-government Companies initiatives For oxygen Supply in India including Tata-Reliance

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण