दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री डॉ. ए.के. वालिया यांचे कोरोनामुळे निधन

Former minister AK Walia death due to corona at Apollo Hospital Delhi

AK Walia Death : दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही वेगाने वाढत आहे. दिल्ली काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अशोक कुमार वालिया (A. K. Walila) यांचेही कोरोनामुळे निधन झाले. वयाच्या 72व्या वर्षी ए. के. वालिया यांचे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात पहाटे 1.30 वाजता निधन झाले. ते मागच्या तीन दिवसांपासून गंभीर आजारी होते. Former minister AK Walia death due to corona at Apollo Hospital Delhi


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही वेगाने वाढत आहे. दिल्ली काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अशोक कुमार वालिया (A. K. Walila) यांचेही कोरोनामुळे निधन झाले. वयाच्या 72व्या वर्षी ए. के. वालिया यांचे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात पहाटे 1.30 वाजता निधन झाले. ते मागच्या तीन दिवसांपासून गंभीर आजारी होते.

दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यांनी ट्वीट केले की, ‘अत्यंत दु:खासह, आम्हाला सांगावे लागतेय की, आमचे दिल्ली कॉंग्रेसचे लोकप्रिय नेते आणि दिल्ली सरकारचे माजी मंत्री डॉ. अशोक कुमार वालिया यांचे आज 22-04-2021 रोजी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात देहावसान झाले.

सीताराम येचुरी यांनाही पुत्रशोक

दुसरीकडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनामुळे निधन झाले. सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष चौधरी यांच्यावर दोन आठवड्यांपासून कोरोनाचे उपचार सुरू होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काल दिल्लीत 249 मृत्यू

बुधवारी दिल्लीत कोरोनाचे 24,638 नवीन रुग्ण आढळले. याबरोबरच येथील एकूण बाधितांचा आकडा 9,30,179 वर पेाहोचला आहे. तर कोरोनाच्या 249 रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा वाढून 12,887 वर गेला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये संसर्गाचे प्रमाण 31.28 टक्क्यांवर गेल्याने चिंता वाढली आहे.

Former minister AK Walia death due to corona at Apollo Hospital Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात