Corona Updates In India : कोरोनाच्या बाबतीत जगभरातील रेकॉर्ड मोडले, एका दिवसात भारतात 3.15 लाख नवे रुग्ण, अमेरिकेलाही टाकले मागे

Corona Updates In India

Corona Updates In India : देशात कोरोना महामारीने पुन्हा एकदा भयंकर रूप धारण केले आहे. या दुसऱ्या लाटेत संसर्गाच्या बाबतीत भारतातील रुग्णसंख्येने जागतिक विक्रम मोडले आहेत. वर्ल्डमीटरनुसार, बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांत 3,15,478 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारीच्या प्रारंभानंतर एकाच दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापूर्वी अमेरिकेत जगात एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले होते. Corona Updates In India: record Break 3.15 lakh new patients in India a single day


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीने पुन्हा एकदा भयंकर रूप धारण केले आहे. या दुसऱ्या लाटेत संसर्गाच्या बाबतीत भारतातील रुग्णसंख्येने जागतिक विक्रम मोडले आहेत. वर्ल्डमीटरनुसार, बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांत 3,15,478 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारीच्या प्रारंभानंतर एकाच दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापूर्वी अमेरिकेत जगात एका दिवसात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले होते.

8 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेत 3,07,570 नवीन रुग्ण आढळले; परंतु आता भारत या बाबतीत पुढे गेला आहे. सलग सहा दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. 24 तासांदरम्यान एकूण 2101 कोरोना रुग्णांचे बळी गेले. यासह देशातील एकूण मृत्यूंचा आकडा 1,84,672 झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1,59,24,732 वर गेली आहे. देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 22,84,209 वर आहे. एकूण संसर्गित रुग्णसंख्येपैकी हे प्रमाण 14.3 टक्के आहे.

बरे होण्याचे प्रमाण घटले

कोरोना संसर्गानंतर रुग्णांचा बरे होण्याचा दर 85.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आकडेवारीनुसार कोरोनातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1 कोटी 34 लाख 47 हजार 040 झाली. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 1.20 टक्के झाले आहे, परंतु महाराष्ट्रात हेच प्रमाण 1.5 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 1.6 टक्के आहे.

आठ राज्यांनी वाढवली चिंता

महाराष्ट्रात चोवीस तासांत देशात सर्वाधिक 8,568 जणांचा मृत्यू झालाय. यानंतर दिल्लीत 249, छत्तीसगडमध्ये 193, उत्तर प्रदेशात 187, गुजरातमध्ये 125, कर्नाटकात 116, पंजाबमध्ये 69 आणि मध्य प्रदेशात 75 जणांचा मृत्यू झाला. या आठ राज्यांमध्ये एकूण 1556 मृत्यू झाले आहेत, जे एकूण 2101 मृत्यूंपैकी 75.2 टक्के आहेत.

सहा राज्यांत सर्वाधिक रुग्णसंख्या

मागच्या 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 67,468 नवीन रुग्ण आढळले. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 33106, दिल्लीत 24638, कर्नाटकमध्ये 23558, केरळमध्ये 22414 आणि छत्तीसगडमध्ये 14519 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Corona Updates In India: record Break 3.15 lakh new patients in India a single day

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात