अनास्थेचा परिणाम : जानेवारीतच केंद्राने कोरोना लाटेचा राज्यांना दिला होता इशारा, दुर्लक्षामुळे महामारीचा झाला उद्रेक

Central Govt Warned State Govts to Take Imp Precautions in January For Corona outbreak, negligence resulted in danger

Corona outbreak : देशात सध्या कोरोना महामारीने अक्षरश: कहर केला आहे. मागच्या 24 तासांत 3.15 लाख नवे रुग्ण आढळल्याने तर जागतिक रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्याही 22 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाविषयक नियमावलीचे पालन सर्व राज्यांनी काटेकोरपणे केले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती. केंद्राच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची परिणती आजच्या उद्रेकात झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने चार राज्यांना कोरोनाविषयक उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या राज्यांत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि केरळ यांचा समावेश होता. Central Govt Warned State Govts to Take Imp Precautions in January For Corona outbreak, negligence resulted in danger


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारीने अक्षरश: कहर केला आहे. मागच्या 24 तासांत 3.15 लाख नवे रुग्ण आढळल्याने तर जागतिक रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्याही 22 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाविषयक नियमावलीचे पालन सर्व राज्यांनी काटेकोरपणे केले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती. केंद्राच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची परिणती आजच्या उद्रेकात झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने चार राज्यांना कोरोनाविषयक उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या राज्यांत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि केरळ यांचा समावेश होता. कारण या राज्यांत तेव्हा हळूहळू दैनंदिन रुग्णसंख्येत वाढीला सुरुवात झाली होती. राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन सूचनाही दिल्या होत्या.

जानेवारी महिन्यातील आरोग्य मंत्रालयाचे हे खालील ट्वीट पाहा. यावरून राज्यांना योग्य उपाययोजना राबवण्याच्या स्पष्ट सूचना खूप आधीच केंद्राने दिल्याचे स्पष्ट होते.

कोरोना संसर्गाबाबत केंद्र सरकारने चिंता व्यक्त करत सर्व राज्यांना कठोर पावले उचलण्यास सांगितले होते. केंद्राने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि केरळ सरकारांना पत्र लिहून खबरदारी व सतर्कता बाळगण्यास सांगितले. याव्यतिरिक्त कोरोना संसर्गाच्या बाबतीत होणाऱ्या वाढीबाबत त्यांनी कठोर उपाययोजना करण्यास सांगितले.

जानेवारी महिन्यात आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते की, अलीकडच्या काळात या चार राज्यात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या कारणास्तव या राज्यांना कडक नियम पाळण्यास सांगितले गेले. विशेषतः कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे खबरदारीचे आदेशात नमूद होते. भारतातील काही भागांत जानेवारीच्या मध्यानंतर नवीन स्ट्रेनच्या रुग्णांची नोंद झाली होती. मंत्रालयाच्या मते, देशातील एकूण कोरोना केसेसपैकी 59 टक्के केसेस या चार राज्यांतील आहेत.

ब्रिटनमार्गे झाला नवीन स्ट्रेनचा शिरकाव

जानेवारी महिन्यात केरळमध्ये ब्रिटनहून परत आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झाल्याचे आढळले होते. यानंतर हळूहळू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढीला लागली. महाराष्ट्रात तेव्हा एका दिवसात 3,729 रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे तेव्हाच केंद्र सरकारने सूचना जारी करून राज्य सरकारने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. सध्या महाराष्ट्रात दररोज 65 हजारांच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती ओढवली आहे.

केंद्राचा पाच सूत्री रणनीतीकडे राज्यांचे दुर्लक्ष

केंद्राने तेव्हा राज्यांसमवेत बैठका घेऊन कोरोनाची तेव्हा संभाव्य असलेली लाट थोपवण्यासाठी पाच सूत्री रणनीतीवर भर देण्याचा आग्रह केला होता. कोरोना टेस्ट्रिंग, काँटॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण, लसीकरण वाढवणे आणि वैद्यकीय उपचारांवर लक्ष देणे यांचा समावेश होता.

कोरोना उद्रेकासाठी निवडणूक सभांना जबाबदार ठरवणाऱ्या नेत्यांनी मात्र निवडणुका नसलेल्या राज्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक दिग्गज राजकारणाऱ्यांनी जानेवारी ते मार्चमध्ये जंगी सभा घेतल्याचे दिसून आले. या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेली जंगा सभा ते नुकताच अजित पवारांचा वादग्रस्त ठरलेला पक्षांतर्गत मेळावा अशा सर्वच बाबी मग कोरोना प्रसारासाठी कारणीभूत मानता येतील. डिसेंबरनंतर जनजीवन हळहळू अनलॉक होत असतानाच राज्यांच्या अनास्थेमुळे दुसऱ्या लाटेची बीजे पेरली गेली. आज देशात अनेक शहरांत बेडसाठी सर्वसामान्यांना धावाधाव करावी लागतेय. लॉकडाऊनमुळे गरीब, मध्यमवर्गीय माणसाची पुन्हा कोंडी झाली आहे. आर्थिक आघाडीवरही देशाला याची मोठी किंमत मोजावी लागतेय. वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राच्या हातात हात घालून काम केले तरच या महामारीला हरवता येणे शक्य आहे.

 

 

केंद्राची 7 जानेवारी 2021 रोजीची राज्यांना सूचना

Central Govt Warned State Govts in January For Corona wave, Outbreaks due to negligence

 

केंद्राची 21 फेब्रुवारी 2021 रोजीची राज्यांना सूचना

Central Govt Warned State Govts in January For Corona wave, Outbreaks due to negligence

 

केंद्राची 25 फेब्रुवारी 2021 रोजीची राज्यांना सूचना

Central Govt Warned State Govts in January For Corona wave, Outbreaks due to negligence

केंद्राची 27 फेब्रुवारी 2021 रोजीची राज्यांना सूचना

Central Govt Warned State Govts in January For Corona wave, Outbreaks due to negligence

 

Central Govt Warned State Govts to Take Imp Precautions in January For Corona outbreak, negligence resulted in danger

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात