पंतप्रधान मोदींनी रद्द केल्या उद्या होणाऱ्या बंगालमधील सर्व सभा, कोरोना परिस्थितीवर घेणार उच्चस्तरीय बैठक

PM Modi canceled Bengal Visit, will hold a high-level meeting on corona situation

PM Modi canceled Bengal Visit : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (शुक्रवार) बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी बंगालमध्ये निवडणूक प्रचाराऐवजी उद्या कोरोनाच्या परिस्थितीवर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यांनी स्वत: त्याबाबत ट्वीट करून माहिती दिली. PM Modi canceled Bengal Visit, will hold a high-level meeting on corona situation


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (शुक्रवार) बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी बंगालमध्ये निवडणूक प्रचाराऐवजी उद्या कोरोनाच्या परिस्थितीवर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यांनी स्वत: त्याबाबत ट्वीट करून माहिती दिली.

23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पीएम मोदी कोरोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर सकाळी दहा वाजता ते कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील मोठ्या ऑक्सिजन उत्पादकांशी बैठक घेणार आहेत.

तत्पूर्वी, 23 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी बंगालमधील चार कार्यक्रमांना संबोधित करणार होते. मालदा, मुर्शिदाबाद, बीरभूम आणि कोलकाता दक्षिण येथे त्यांचे मेळावे नियोजित होते. या मेळाव्यासाठी बंगाल भाजपने जवळजवळ पूर्ण तयारी केली होती. परंतु आता पंतप्रधान मोदींचे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे की, ते उद्या कोरोनावरील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. यामुळे ते पश्चिम बंगालमध्ये जाणार नाहीत.

PM Modi canceled Bengal Visit, will hold a high-level meeting on corona situation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण