आनंदाची बातमी : १८ वर्षांवरील सर्वांना २८ एप्रिलपासून रजिस्ट्रेशनची मुभा, अशी करा नोंदणी

good news corona Vaccination Registration Will starts From April 28 For everyone above age of 18

Corona Vaccination Registration : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी सुरू होईल. या दिवसापासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील. good news corona Vaccination Registration Will starts From April 28 For everyone above age of 18


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी सुरू होईल. या दिवसापासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील.

अफवांना बळी पडू नका

आतापर्यंत अफवा सुरू होती की, 18 वर्षांच्या पुढील सर्वांना 24 एप्रिलपासून रजिस्ट्रेशन करता येईल. परंतु या अफवांना विराम लावतानाच मायगॉव्ह इंडियाने ट्विट केले आहे की, कोविन प्लॅटफॉर्म तसेच आरोग्य सेतू अॅपवर 24 एप्रिलपासून नव्हे, तर 28 एप्रिलपासून लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. यामुळे अफवांकडे लक्ष देऊ नका.

लस मोफत मिळेल का? लवकरच होणार निर्णय

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याबाबत अद्याप स्पष्ट आदेश नाहीयेत. प्रोटोकॉलबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. तथापि, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे. त्यांचाच कित्ता गिरवत मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सरकारनेही मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. तथापि, महाराष्ट्रात ही लस मोफत मिळेल की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे.

दरम्यान, यापूर्वी 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनाच लस घेण्याची परवानगी होती, परंतु आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांनाच 1 मेपासून लस मिळणार आहे. लसीकरण केंद्रावर यासाठी तुम्हाला आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल.

good news corona Vaccination Registration Will starts From April 28 For everyone above age of 18

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण