नारायण राणे यांच्या अटकेच्या प्लॅनमागचे मास्टरमाइंड अनिल परब, पोलीसांच्या सतत संपर्कात, व्हिडीओ व्हायरल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यामागच्या प्लॅनचे मास्टरमाइंड परिवहन मंत्री अनिल परब होते असे समोर आले आहे. परब हे सतत पोलीसांच्या संपर्कात होते. पोलीसांवर दबावही आणत होते असा व्हिडीओ समोर आला आहे.Anil Parab, mastermind behind Narayan Rane’s arrest plan, in constant touch with police, video goes viral

शिवसेना नेते अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते. त्यावेळी झालेले संभाषण माईकमध्ये रेकॉर्ड झाले होते. यामध्ये परब म्हणत आहेत की, • मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारुन घेतो सीएम साहेबांना.
 • हो, फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना?
 • हो हो हो. मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो.ठिक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब. ठिकाय मी आता ताबडतोब बोलतो.
 • त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव हे मोबाईलमधील काहीतरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, कोटार्ने पण नकार दिलाय..त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात.
 • हॅलो, काय करताय तुम्ही लोकं??
 • नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये?
 • ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते?
 • अहो कोटार्ने जे काय आहे ते हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये
 • हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.
 • पण मग घ्या ना,,, पोलीस फोर्स वापरुन करा. अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची
 • ठिकाय.. ओके

फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं. मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली. आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत..

 • भास्कर जाधव म्हणतात.. चला आता (पत्रकार परिषद) संपवायला हवं.
 • त्यादरम्यान पत्रकार अनिल परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का?
 • त्यावर अनिल परब म्हणतात.. मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आता सांगू शकत नाही अटक झाली की नाही. मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू.

Anil Parab, mastermind behind Narayan Rane’s arrest plan, in constant touch with police, video goes viral

हत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी