वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन, आंदोलनात आले केवळ आठ जण


विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यवतमाळ येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात केवळ सात ते आठ जणांनी सहभाग घेतला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गुरूवारी करण्यात आले. यावेळी वेगळ्या विदर्भ राज्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली. अवधूतवाडी पोलीसांनी सात ते आठ जणांना स्थानबद्ध केले आहे.Agitation for a separate Vidarbha state, only 7 to 8 came into the agitation

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील अनेक वर्षापासून समिती लढा देत आहे. मात्र शासनाने त्यांची कुठलीच दखल घेतलेली नाही,असा समितीचा आरोप आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आर्णीरोडवरील अभ्यंकर कन्या शाळेसमोर रस्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.यावेळी विदर्भाचे स्वतंत्र राज्य करण्यात यावे, कोरोना काळातील वीज बिल माफ करून ते शासनाने भरावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.

Agitation for a separate Vidarbha state, only 7 to 8 came into the agitation

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण