काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; परदेशी नागरिकांना सावधानतेचा इशारा


वृत्तसंस्था

काबूल : विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून परदेशी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आय़सिसकडून मानवी बॉम्बच्या माध्यमातून हा हल्ला होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे. Kabul Airport Terror Attack Threat Evacuation started form Uk Us Australia

अफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया प्रयत्न करत आहे. काबूल विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. या भागात दहशतवादी हल्ला होण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळाबाहेर जमलेल्या नागरिकांनी तात्काळ इतर ठिकाणी, सुरक्षित जागी जावं अशा सूचना जारी केल्या आहेत.



३१ ऑगस्टच्या आत बचावकार्य पूर्ण करण्याचं लक्ष्य असताना हा इशारा देण्यात आला आहे. तालिबानने देश ताब्यात घेतल्यापासून ८० हजाराहून अधिक नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्यात आलं आहे. तर विमानतळावर झालेल्या घाईगर्दीमुळे ८ जणांचा जीव गेल्याचंही इंडिया टुडेने वृत्तात नमूद केलं आहे.

द गार्डियनमधील एका अहवालानुसार, ब्रिटनने दहशतवादी हल्ल्याचा सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं आहे. आय़सिसच्या मानवी बॉम्बच्या माध्यमातून हा हल्ला होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडूनही आपल्या अफगाणिस्तानातील देशवासीयांना विमानतळावर अथवा आसपास जमा न होण्याच्या सूचना केल्या आहेत. जे कोणी विमानतळाच्या आसपास आहेत, त्यांनी तात्काळ बाजूला व्हावे असा इशाराही त्यांनी दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली आहे. तालिबानने काबूल विमानतळ परिसरात आपलं वर्चस्व अधिक मजबूत केलं आहे. त्यानंतर ह्या सूचना विविध देशांकडून देण्यात आल्या आहेत.

Kabul Airport Terror Attack Threat Evacuation started form Uk Us Australia

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात