सावधान, डेल्टा प्लसचा २४ जिल्ह्यांत प्रादुर्भाव; सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव जिल्ह्यात


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील २४ जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्य़ामध्ये आढळले आहेत. तरी त्या तुलनेत येथे बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. Delta Plus outbreak in 24 districts; Most patients in Ratnagiri, Jalgaon district

नव्याने २७ डेल्टा प्लसबाधित रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. आता एकूण २४ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचे सिक्वेन्सिंग चाचण्यांमधून निदर्शनास आले आहे. यात ५० टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागात आढळले आहेत.

जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी

जळगाव (१३), रत्नागिरी (१५), मुंबई (११), कोल्हापूर (७), ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोली प्रत्येकी सहा, नागपूर (५), अहमदनगर (४), पालघर, रायगड, अमरावती प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, नाशिक प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा प्रत्येकी एक.

९८ रुग्ण आजारातून बरे

पाच रुग्णांचा मृत्यू (रत्नागिरी दोन आणि बीड, मुंबई आणि रायगड प्रत्येकी एक)
१७ जणांच्या लशींच्या दोन्ही मात्रा, तर १८ जणांची केवळ एक मात्रा पूर्ण.

Delta Plus outbreak in 24 districts; Most patients in Ratnagiri, Jalgaon district

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण