रश्मी ठाकरेंविरुद्ध तक्रार जाताच संजय राऊतांनी घेतली अग्रलेखाची जबाबदारी, केंद्रीय मंत्री राणेंविरुद्ध आक्षेपार्ह लिखाणाचा आरोप

Sanjay Raut Takes Responcibility Of Editorial in Saamana Criticizing Union Minister Narayan Rane

Sanjay Raut Takes Responsibility Of Editorial : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध या अग्रलेखात अत्यंत शिवराळ भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकमध्ये या अग्रलेखावरून दै. सामनाच्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता आक्रमक होत ते म्हणाले की, त्या अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची आहे, रश्मी ठाकरेंची नाही. Sanjay Raut Takes Responsibility Of Editorial in Saamana Criticizing Union Minister Narayan Rane


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राणेंना अटक व सुटका झाल्यानंतर आता शिवसेनेच मुखपत्र ‘सामना’चा अग्रलेख वादात सापडला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध या अग्रलेखात अत्यंत शिवराळ भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकमध्ये या अग्रलेखावरून दै. सामनाच्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता आक्रमक होत ते म्हणाले की, त्या अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची आहे, रश्मी ठाकरेंची नाही.

काय म्हणाले संजय राऊत?

पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, ‘सामनाचा मी कार्यकारी संपादक आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी हा संजय राऊत घेतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिले आहे. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्यासाठी नारायण राणे यांनी चांगले काम करुन देश पुढे न्यायला हवा. पण ते महाराष्ट्रात येऊन केवळ बेताल बडबड करणार असतील तर शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात विधायक टीकेची परंपरा आहे. तशी टीका झाल्यास शिवसेना त्याचे स्वागत करेल, असेही ते म्हणाले.

राणे विरुद्ध शिवसेना वाद चिघळला

मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. राणेंच्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले, यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या दिवशी रात्री उशिरा त्यांना जामीन मिळाला. यादरम्यान शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये आलेल्या अग्रलेखानेही खळबळ उडाली. केंद्रीय मंत्र्यांविरुद्ध या अग्रलेखात अर्वाच्य शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याच भाषेवर आक्षेप नोंदवत सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Raut Takes Responsibility Of Editorial in Saamana Criticizing Union Minister Narayan Rane

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात