भोसरीत साकारली शिवरायांची ४० फुटी रांगोळी ‘मोडी गर्ल ‘श्रुती गावडे’ यांची छत्रपती शिवरायांना मानवंदना 


विशेष प्रतिनिधी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला चिंचवड मधील मोडी गर्ल श्रुती गणेश गावडे या तरुणीने एका वेगळ्या प्रकारे महाराजांना अभिवादन केले. भोसरी येथील आंबेडकर मैदान येथे मोडी लिपीत एक लाख अकरा हजार एकशे अकरा वेळा ‘जय शिवराय’ असे लिहीत ४० फुटी रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.40 feet rangoli of Shivaraya made in Bhosari

भारतात प्रथमतः शिवरायांची प्रतिकृती तेही मोडी लिपी मध्ये साकरण्यात आली आहे. दरम्यान महाराजांची ही नयनरम्य आणि भव्य रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी या ठिकाणी हजेरी लावत आहेत.

या कलाकृती साठी श्रुतीला सुमारे २२० किलो रांगोळी लागली आहे. इतक्या प्रचंड रांगोळीतून तिने साकारलेली ही भव्य प्रतिमाही तितकीच भव्य आहे. विशेष म्हणजे  ४८ तास या रांगोळीवर केले असून अपार मेहनतीनंतर ही रांगोळी पूर्ण केली आहे. ही अनोखखी कलाकृती साकारण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे व शिवराय प्रोडक्शन यांचेही सहकार्य लाभले.

40 feet rangoli of Shivaraya made in Bhosari

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात