मुंबई पोलिसांच्या बदल्यांचा डाटा लिक; सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल मुंबई पोलिसांचे समन्स


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात मुंबई पोलिसांच्या बदल्यांचा डाटा लिंक झाला. याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स पाठविले आहे. येत्या 14 तारखेला सायबर सेल पुढे हजर राहण्यास संदर्भातले हे समन्स आहे.CBI Director Subodh Kumar Jaiswal has been summoned by Cyber Cell of Mumbai Police in connection with leak of Maharashtra Intelligence

सुबोध कुमार जयस्वाल हे सीबीआयचे संचालक होण्यापूर्वी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. त्यांनी स्वतःहून महाराष्ट्रातून बदली मागून केंद्र सरकारच्या सेवेत घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना केंद्र सरकारच्या सेवेत घेण्यात आले.

महाराष्ट्रात त्यांच्या पोलीस महासंचालक पदाच्या काळात आणि नंतरच्या काळात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या ज्या काही बदल्या आणि नियुक्त्या झाल्या त्या वरून मोठे प्रश्नचिन्ह उमटले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदल्यां संदर्भात तयार केलेला गुप्त अहवाल लिक झाल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर सीबीआयचे संचालक म्हणून सुबोध कुमार जयस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 14 ऑक्टोबरला चौकशी आणि तपासासाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार यांच्यातल्या राजकीय वादाचे पडसाद केंद्रीय तपास संस्था आणि राज्यातील तपास संस्था यांच्यामध्ये उमटल्याचे यातून दिसून येत आहे. या दोन्ही स्तरांवरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दोन सरकारांना मधल्या राजकीय वादातून मतभेद तयार झाले सल्याचेही स्पष्ट होत आहे.

CBI Director Subodh Kumar Jaiswal has been summoned by Cyber Cell of Mumbai Police in connection with leak of Maharashtra Intelligence

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात