नितेश तिवारी बनवताहेत रामायणावर आधारित बिग बजेट सिनेमा! हृतिक रोशन आणि रणबीर कपूर लीड रोलमध्ये दिसतील


विशेष प्रतिनिधी

मुंबई : डीडी नॅशनल वर प्रदर्शित होणारा रामानंद सागर यांचा ‘रामायण’ हा शो प्रचंड हिट ठरला होता. या शोनंतर बऱ्याच फिल्ममेकर्सनी रामायणावर आधारित सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही या शोची बरोबरी करु शकले नाहीत. तर आता दंगल डिरेक्टर नितेश तिवारी रामायणावर आधारित सिनेमा बनवणार आहेत. आणि या सिनेमामध्ये हृतिक रोशन आणि रणबीर कपूर अभिनेत्यांना प्रमुख कलाकारांच्या भूमिकेसाठी घेणार असल्याची चर्चा सध्या सिनेसृष्टीमध्ये आहे.

Dangal movie director nitesh tiwari is set to make film based on ramayana, hrithik roshan and ranbir kapoor will play lead characters

बाहुबली या सिनेमाच्या सुपरडुपर हिट यशानंतर पीरियड मुव्ही बनवण्याचा एक ट्रेंड बॉलीवूडमध्ये आला आहे. बाहुबली सिनेमा नंतर प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी, पद्मावत, तानाजी द अनसंग वॉरियर, पानिपत यांसारख्या सिनेमांनी देखील प्रचंड यश मिळवले होते. तर याच रांगेमध्ये आता रामायणावर आधारित सिनेमा लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे.


Bell Bottom Movie : अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’चा चित्रपटगृहांमध्ये धमाका, पहिल्या दिवशी एवढ्या कोटींची कमाई


७५० कोटी रुपये इतके या सिनेमाचे बजेट असणार आहे. तर या सिनेमातील लीड कॅरेक्टर प्ले करणाऱ्या हृतिक रोशन आणि रणबीर कपूर यांना प्रत्येकी ७५ कोटी रुपये मानधन देण्यात येणार आहे. सीतेच्या भूमिकेसाठी अजून कोणत्याही अभिनेत्रीचे नाव फायनल झालेले नाहीये. पण ह्या रोलसाठी करीना कपूर हिच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. नितेश तिवारी या सिनेमाचे दिग्दर्शन करतील तर मधु मंटेना या सिनेमाचे प्रोड्यूसर असणार आहेत.

Dangal movie director nitesh tiwari is set to make film based on ramayana, hrithik roshan and ranbir kapoor will play lead characters

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण