चिपी विमानतळ उद्घाटन : शेजारी खुर्च्या तरीही ना नमस्कार, ना नजरेला नजर, ठाकरे-राणेंमधील बेबनाव कार्यक्रमातही तसाच


कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा आज अवघ्या राज्यात रंगली आहे. कारणही तसंच आहे. तब्बल सोळा वर्षांनी ठाकरे आणि राणे एकाच मंचावर आले आहेत. दरम्यान, या सोहळ्यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहिलंही नाही किंवा नमस्कारही केला नाही. ठाकरे आणि राणेंमधील वितुष्ट अवघ्या राज्याला माहिती आहे, आज या कार्यक्रमावेळी हेच दिसून आलं. Sindhudurg Chipi Airport Inauguration Funcion CM Thackeray Union Minister Rane And Dy CM Ajit Pawar Present


प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा आज अवघ्या राज्यात रंगली आहे. कारणही तसंच आहे. तब्बल सोळा वर्षांनी ठाकरे आणि राणे एकाच मंचावर आले आहेत. दरम्यान, या सोहळ्यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहिलंही नाही किंवा नमस्कारही केला नाही. ठाकरे आणि राणेंमधील वितुष्ट अवघ्या राज्याला माहिती आहे, आज या कार्यक्रमावेळी हेच दिसून आलं.

विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतर अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी केंद्रीय नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार केला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार केला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे पाहिलं, ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं.उद्घाटन सोहळा

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक नेते आणि मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि राणेंचं स्वागत केलं. पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे कोनशिलेच्या दिशेने रवाना झाले. नंतर काही वेळातच राणे कोनशिलेजवळ आले. तब्बल 16 वर्षांनंतर राणे आणि ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. हे दोघेही किमान एकमेकांना बोलतील अशीच सर्वांना अपेक्षा होता, पण तसे काहीही झाले नाही.

Sindhudurg Chipi Airport Inauguration Funcion CM Thackeray Union Minister Rane And Dy CM Ajit Pawar Present

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण