क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टीतून पकडलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाबा, अमीर फर्निचरवाला यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने का सोडले?; नवाब मलिक यांचा खोचक सवाल


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबई – गोवा क्रूजवर ड्रग्ज रेव्ह पार्टी दरम्यान छापेमारी करून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर आरोपांची सरबत्ती महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी सुरूच ठेवली आहे.After raid on a cruise ship off Mumbai coast, NCB’s Sameer Wankhede had said that 8-10 people were detained.

क्रूज वरच्या छाप्यात प्रत्यक्षात 11 जणांना पकडण्यात आले होते. परंतु रिषभ सचदेव, प्रतीक गाबा, अमीर फर्निचरवाला यांना सोडून देण्यात आले, असा दावा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. नबाब मलिक यांनी कालपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती चालवली आहे. त्यामधला हा नवा आरोप आहे. नबाब मलिक म्हणाले, की मुंबई – गोवा क्रूज वरच्या छाप्यांमध्ये आठ-दहा लोकांना पकङण्यात आल्याचे निवेदन समीर वानखेडे यांनी दिले होते.

वानखेडे यांच्या सारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा एखादी कारवाई करतात तेव्हा ती गंभीर असते. परंतु माहिती देताना ते नेमक्या आकड्यांमध्ये का देत नाहीत? आठ – दहा लोकांना पकडले, अशा स्वरूपाची ढोबळ माहिती ते कशी काय देऊ शकतात?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता.

याचाच पुढचा भाग आज पत्रकार परिषदेत नबाब मलिक यांनी स्पष्ट केला. क्रूज वर एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. परंतु तिघांना सोडून देण्यात आले. समीर वानखेडे यांचे कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची छाप यादरम्यान बोलणे झाले असेल. म्हणूनच रिषभ सहदेव प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांना पकडून सोडून देण्यात आले असावे, असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला. यासंदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल बिरोबाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

After raid on a cruise ship off Mumbai coast, NCB’s Sameer Wankhede had said that 8-10 people were detained.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात