विशेष प्रतिनिधी
येवला : माघी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करीत नगरसुलला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी खंडेराव महाराजांची पूजा अर्चा करण्यात आली. Yelkot Yelkot Jai Malhar’s alarm; Twelve cart were pulled at Nagarsul for Khanderao Maharaj Yatra
नाशिक जिल्हयातील गावांमध्ये खंडेराव महाराजांचा यात्रा उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे दोन वर्षा पासून यात्रा बंद होत्या. आता कोरोना काहीसा आटोक्यात आल्यामुळे सर्वच धर्मीय सण-उत्सव साजरे केले जात असून येवला तालुक्यातील नगरसुल गावामधील खंडेराव महाराजांची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख आहे. ड्रोनचा खुबीने वापर करून १२ गाड्या ओढण्याचे छायाचित्र बाळासाहेब लगड यांनी टिपले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App