विशेष प्रतिनिधी
सोलापूर – मकाई साखर कारखान्याने विनापरवाना गाळप केले. त्यामुळे साखर आयुक्तांनी प्रति टन ५०० रुपये दंड कारखान्याला ठोठावला आहे. Unlicensed grinding from makai sugar factory; Sugar commissioner slaps Rs 5 crore fine
गाळप हंगाम २९२०- २१ मधील शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी न दिल्याने साखर आयुक्तांनी मकाई कारखान्याला गाळप परवाना नाकारला होता. मात्र बेकायदेशीरपणे गाळप सुरू केले.
१ लाख १२ हजार ६०५ टन ऊसाचे विना परवाना गाळप केलेले आहे. विना परवा परवाना गाळप केलेल्या ऊस ऊस गाळपावर रु.५०० प्रति टन प्रमाणे पाच कोटी त्रेसष्ट लाख दोन हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. सदर दंडाची रक्कम मकाई सहकारी साखर कारखाना लि भिलारवाडी पोस्ट जिंती, ता. करमाळा जि. सोलापूर यांनी आदेश झाल्यापासून १५ दिवसाच्या आत शासकीय कोषागारात भरणा करावी असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App