प्रतिनिधी
कोल्हापूर /मुंबई : राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी अपक्ष संभाजीराजे यांनी अजूनही आशा सोडलेली नाही नाही, पण तरीही होय – नाही, होय – नाही असे शिवसेना आणि संभाजी राजे यांचे “राजकीय कदम ताल” सुरू आहेत. Shiv Sena – Sambhaji Raje’s “Political Steps Rhythm
शिवबंधन बांधणार नाही, असे सांगून संभाजी राजे काल कोल्हापूरला निघून गेले होते. पण आज अचानक ते कोल्हापूर निघून आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. संभाजीराजे हे छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. त्यांनी एक पाऊल पुढे यावे. आम्ही दोन पावले मागे जातो, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना आणि संभाजीराजे यांचा “राजकीय कदम ताल: सुरू असल्याचे दिसून आले. काल कोल्हापूरला निघून गेलेले संभाजीराजे आज मात्र सायंकाळी मुंबई पोहोचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे संभाजी राजे यांची उमेदवारी “अपक्ष” की “शिवसेना पुरस्कृत अपक्ष” याचा निर्णय सायंकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, छत्रपती संभाजीराजेंच्या घराण्याचा नक्की सन्मान करू.
शिवसेनेकडून पाठिंबा असेल फक्त त्याआधी छत्रपतींनी शिवबंधन बांधावे. असा प्रस्ताव शिवसेनेकडून त्यांना देण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव सोमवारी संभाजीराजेंनी फेटाळून लावला होता. यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास असून ते छत्रपतींच्या घराण्याचा नक्कीच सन्मान करतील , असेही संभाजी राजेंनी म्हटले आहे. माझी आणि मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आहे. ते छत्रपती घराण्याचा मान राखतील असा मला विश्वास आहे, असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यावर दाखवला पण आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
संभाजी राजेंनी व्यक्त केलेल्या अपेक्षेवर उत्तर देताना राऊत म्हणाले, आम्ही निश्चितच छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करू,पण राज्यसभेच्या जागेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील, त्यामुळे शिवसेनेने संभाजीराजे यांच्या विरोधात उमेदवार निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे घोषणा करतील, असेही राऊत म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App