विशेष प्रतिनिधी
पुणे : NEET Paper Leak Case नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी आणि रेणुकाई करिअर सेंटरचे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ११ जुलैपर्यंत वाढ केली आहे. बुधवार, ८ जुलै रोजी जुन्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. सीबीआयच्या सरकारी वकिलांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.NEET Paper Leak Case
मूळचा लातूरचा असलेला पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा तज्ज्ञ असून तो सलग काही वर्षे नीटचा पेपर काढणाऱ्या समितीचा सदस्य होता. तसेच मोटेगावकर याने “आपल्या कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरे प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली” असा सीबीआयचा आरोप आहे. मे महिन्यात ज्या वेळी मोटेगावकरला अटक करण्यात आली होती तेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये ३ मे रोजीचा लीक झालेला पेपर सापडला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App