Mumbai : मुंबईत कुठूनही करा टोल फ्री प्रवेश; निवडणुकीपूर्वी शिंदे – फडणवीस सरकारची भेट!!

Mumbai

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिंदे – फडणवीस सरकारने धडाधड निर्णय घेण्याचा धडाका लावताना मुंबईत करा कुठूनही टोल फ्री प्रवेश अशी घोषणा आज केली. मंत्रालयात हालचालींना वेग आला असून असून आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली.  मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी  करण्यात आला आहे. आज रात्री 12.00 वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. Mumbai toll free road

या 5 टोलनाक्यांवर टोलमाफी 

– आनंदनगर टोलनाका

– दहिसर टोलनाका

– मॉडेला टोलनाका

– वाशी टोलनाका

– ऐरोली टोलनाका

राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली.  हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा. नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल!!

– मंत्रिमंडळाचा अजेंडा

महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची  शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता ठेवण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे. बैठकीच्या आधी कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिका-यांना अजेंडा दिला गेला नाही . त्यामुळे आयत्यावेळी अनेक निर्णय होणार आहे.

– आधीपासूनच निर्णयांचा धडाका

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो. त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. याआधी महायुती सरकारने समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केले आहे.

Mumbai toll free road

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात