‘डीजेने माझ्या भावाचा जीव घेतला…’ मंत्री मेघना बोर्डीकर भावुक; डीजे बंदीची मागणी

विशेष प्रतिनिधी

धाराशिव : गेल्या वर्षी गणेशोत्सवात माझा सख्खा भाऊ फक्त डीजेमुळे मृत्युमुखी पडला. आपण वारंवार सांगतो की सर्वोच्च न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे. परंतु, लोकांना ते मान्य नाही. डीजेमुळे घातक परिणाम होऊ शकतात, हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे, असे सांगत मंत्री मेघना बोर्डीकर यांनी डीजे बंदीला पाठिंबा दिला. Meghna Bordikar

सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून लावले जाणारे डीजे आणि लाऊडस्पीकर गरज पडल्यास बलप्रयोगाने बंद करावेत, या पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे.



ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर या मुद्द्यावरून दोन गट पडले असून, एक गट डीजे आणि ढोल-ताशांच्या समर्थनार्थ, तर दुसरा गट ध्वनिप्रदूषणाचा दाखला देत डीजेबंदीच्या बाजूने उभा ठाकला आहे. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनीही डीजेबंदीला जाहीर पाठिंबा दिला

धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या, डीजेवर बंदी घालणे हे योग्य आहे. डीजे वाजवायला नको. आपण सगळे सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. परंतु, त्यापासून त्रास व्हायला नको, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Meghna Bordikar backs DJ ban, says brother died due to loud music during Ganeshotsav

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात