मेहनती विद्यार्थ्यांच्या कष्टांना यशाची पावती; मुख्यमंत्र्यांचा विश्वास ठरला सार्थ!

विशेष प्रतिनिधी

मुंबई: औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा पोलिसांकडून गतिमान तपास सुरू आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरुच असून या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग आढळेल, त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल, अशाच सुधारणा आम्ही करीत आहोत. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या.



विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक त्या सुधारणा सर्व घटकांना विश्वासात घेऊन तातडीने अंमलात आणल्या जातील, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अतिशय पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. ही प्रक्रिया अधिक कशी सुदृढ करता येईल यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. त्यात युपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटी प्राध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचा शासन आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला असून ही समिती राज्यभर सर्व विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत प्रक्रिया करणार आहे. पुण्यात सुद्धा ही समिती जाईल. एकीकडे हे प्रयत्न होत असताना काही कठोर कायदे सुद्धा करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल.

या शिष्टमंडळामध्ये सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे यांसारखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना प्राधान्यक्रम देत, MPSC पेपरफुटीच्या गैरप्रकारात आयोगातील किंवा आयोगाबाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग आढळेल, त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल, असे मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट केले.

CM confident hard-working students will get their due

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात