विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra government राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनच आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मोबाईलवर ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. योजनेमध्ये योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा तसेच पारदर्शकता रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.Maharashtra government
राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर करण्यात आली आहे. या योजनेत दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या आहेत. या शिवाय कर भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती केंद्र शासनाकडून राज्याला पाठविली जात आहे. त्यानुसार कर भरणा करणारे शेतकरी या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे.Maharashtra government
दरम्यान, शासनाने या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे ५३३ शेतकऱ्यांची यादी जाहिर केली आहे. उर्वरीत पात्र शेतकऱ्यांची यादी पुढील काही दिवसांतच जाहिर केली जाणार असून त्यासाठी शासनस्तरावरून युध्दपातळीवर काम सुरु आहे. पुढील पंधरा ते वीस दिवसांत सर्व याद्या जाहिर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आता या योजनेत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पुर्वी आधार प्रमाणीकरण करतांना मोबाईलवर ओटीपी क्रमांक घेतला जात होता. मात्र आता ओटीपी क्रमांकावरून आधार प्रमाणीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असून त्या सोबतच बँकेत किंवा नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात प्रत्यक्ष जाऊनच बायोमेट्रीकद्वारे आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रमाणीकरण बोटाचे ठसे किंवा आयरिस पध्दतीनेच होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार असल्याचा दावा केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App