गेल्या २४ तासांतील कोरोना बधितांचा समावेश करून पाच लाख चार हजार ३३० एवढी आजपर्यंत बाधित संख्या झाली आहे. In Pune, 44 new corona victims were registered, 89 were discharged, appealed by the Municipal Corporation
विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या २४ तासांत( सोमवारी) शहर आणि हद्दीबाहेरील भागात एकही करोना बाधित मृताची नोंद झाली नाही. दरम्यान दिवाळीच्या पहिल्या दिवशीच ही आनंदाची बाब आहे. मात्र,आता नव्या ४४ बाधितांची नोंद झाली आहे.तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांतील कोरोना बधितांचा समावेश करून पाच लाख चार हजार ३३० एवढी आजपर्यंत बाधित संख्या झाली आहे.तसेच ४ लाख ९४ हजार ५७० एवढे बाधित बरे झाले आहेत. तर ९ हजार ७४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
तसेच दिवसभरात ४०९८ संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे. दरम्यान, सक्रीय बाधितांची संख्या वेगाने घटत चालली असून, सध्या ती संख्या ६८६ आहे. यामध्ये ११७ जणांची प्रकृती गंभीर असून, ९७ जण ऑक्सिजनवर आहेत.
गेल्या दोन-तीन आठवड्यापासून करोना मृतांची संख्या बऱ्याचदा शून्यावर नोंदवली गेली आहे. त्यामुळे करोनाचे सावट हळूहळू कमी होऊ लागले आहे. तरीसुद्धा दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App