बिहारमध्ये 5 पक्षांची महायुती, तर महाराष्ट्रात अजून दोघांना स्कोप; राज + फडणवीस दिल्लीत दाखल!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बिहार मध्ये जर भाजपने राजकीय फेररचना करून 5 पक्षांची युती घडवून आणली, तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात देखील महायुतीमध्ये सध्या 3 पक्ष सामील असताना आणखी 2 पक्षांना स्कोप आहे, असेच भाजपच्या आजच्या खेळीने उघड झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्याची बातमी आली. महायुतीमध्ये मनसेला सहभागी करून घेऊन लोकसभेची एखाद दुसरी जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखवून महाराष्ट्रात महायुतीची बेरीज 4 वर नेली आहे. Grand alliance of 5 parties in Bihar, scope for two more in Maharashtra

बिहारमध्ये भाजप प्रभारी विनोद तावडे यांनी मुसधेगिरी दाखवून 5 पक्षांची महायुती घडवून आणली. तिथे जागावाटपही जाहीर केले. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत तिथे 5 पक्षांना भाजपने जागावाटप करून स्वतः मोठा भाऊ म्हणून स्थिर झाला आहे. महाराष्ट्र तर सध्याच्या बिहार पेक्षा मोठे राज्य आहे, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत त्यामुळे महायुतीतल्या 3 पक्षांना जागावाटप करण्याबरोबरच आणखी 2 पक्षांना महाराष्ट्रात स्कोप असू शकतो, असे मानून भाजपने सुरुवातीपासून चाचपणी केली होती. मनसेला मुंबईत एक जागा देऊन महायुतीत आणण्याची भाजपची तयारी होतीच. त्यादृष्टीनेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दिल्ली दाखल झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारच्या पत्रकार परिषदेत मनसे योग्य वेळेला महायुती देऊ शकतो असे सूचक वक्तव्य केले होते त्याला आजच्या सायंकाळच्या राजकीय हालचालीतूनच दुजोरा मिळाला.

दरम्यानच्या काळात महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये इन्कमिंग देखील वाढले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मिलिंद देवरा या माजी खासदाराने प्रवेश केला. आता त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यादेखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती पुढे मोठे आव्हान उभे करण्याच्या बेतात आहे. शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचा मोहरा आधीच पटावर आणून महाविकास आघाडीला जमलेच नाही, तर जरांगेंच्या रूपाने नवे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे महायुतीतले नेते सावध पावले टाकत बेरजेचे राजकारण करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी छोट्या मोठ्या घटक पक्षांना आपल्याशी जोडून घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मनसेला महायुतीत सामील करण्याचे घाटत आहे.

Grand alliance of 5 parties in Bihar, scope for two more in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात