महादेव सट्टा ॲपप्रकरणी भूपेश बघेलांविरुद्ध FIR; छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांसह 21 आरोपी

वृत्तसंस्था

रायपूर : महादेव सट्टा ॲप प्रकरणात, ईओडब्ल्यू (आर्थिक संशोधन शाखा) ने ईडीच्या तक्रारीवरून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह 21 आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यात ॲप प्रमोटर्स सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि अनेक अनोळखी पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांच्या नावांचाही समावेश आहे.FIR against Bhupesh Baghel in Mahadev Satta app case; 21 accused including former Chief Minister of Chhattisgarh

ईडीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, महादेव ॲप प्रमोटर्स पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रभावशाली राजकीय व्यक्तींचे संरक्षण होते. ॲपच्या प्रमोटर्सवर कारवाई थांबवण्यासाठी या आरोपींना संरक्षण मनी म्हणून नियमितपणे मोठी रक्कम दिली जात होती.



हवाल्याच्या माध्यमातून प्रोटेक्शन मनी देण्यात आला

महादेव बुकच्या ऑपरेटर्सच्या माध्यमातून पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकारण्यांना हवाल्याद्वारे प्रोटेक्शन मनी पाठवण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून प्रवर्तकांकडून आर्थिक लाभ घेत अवैध संपत्ती मिळवली. ईडीने तात्पुरत्या स्वरूपात अनेक स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या कलमान्वये गुन्हे

4 मार्च रोजी, या सर्व आरोपींवर EOW मध्ये कलम 120B, 34, 406, 420, 467, 468, 471, सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7, 11 आ्णि भ्रष्टाचार विरोधी (सुधारणा) कायदा 2018 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

FIR against Bhupesh Baghel in Mahadev Satta app case; 21 accused including former Chief Minister of Chhattisgarh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात