एल्विश यादववर गेल्या वर्षी एका रेव्ह पार्टीसाठी सापाचे विष पुरवल्याचा आरोप आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : यूट्यूबर एल्विश यादवविरोधात नोएडा पोलिसांनी मोठी कारवाई करत त्याला अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण सापाच्या विषाशी संबंधित आहे. स्थानिक पोलिसांनी रविवारी चौकशी केल्यानंतर एल्विशला अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार एल्विशला नोएडा सेक्टर 113 च्या स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. एल्विश यादववर गेल्या वर्षी एका रेव्ह पार्टीसाठी सापाचे विष पुरवल्याचा आरोप आहे.Youtuber Elvish Yadav arrested by Noida police
बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवला नोएडा सेक्टर 113 च्या स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. एल्विशने गेल्या वर्षी रेव्ह पार्टीसाठी सापाचे विष पुरवले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विशविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विशची चौकशी केली होती. पण त्याच्या उत्तराने स्थानिक पोलिसांचे समाधान झाले नाही आणि त्याला एल्विशला अटक करण्यात आली. नोएडा पोलिसांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच पाच जणांना अटक केली आहे. राहुल, जयकरण, नारायण, टिटू नाथ आणि रविनाथ यांची नावे याच्याशी जोडलेली आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नोएडा पोलिसांनी राहुल यादवकडून २० मिली विष जप्त केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App