विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असताना अजून मुख्यमंत्री पदाचे नाव माध्यमांना समजलेले नाही म्हणून भाजपमधून वेगवेगळी नावे आणून पुढे माध्यमेच परस्पर कापतायेत का त्यांचे पत्ते??, असा सवाल तयार झाला आहे.Bringing forward different names from BJP
भाजप महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईतल्या आझाद मैदानावर होईल, असे ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यामुळे माध्यमांना महायुतीचे सरकार स्थापन होण्याची गॅरंटी निर्माण झाली परंतु भाजप मधल्या कुठल्याच सोर्सेस मधून मुख्यमंत्रीपदासाठीचे कन्फर्म नाव समोर येईना त्यामुळे माध्यमांनी परस्परच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमधून नावे चालवून पाहिली. त्यामध्ये जातीय गणिते बसवून पाहिली पण माध्यमांना यातले कुठलेच नाव स्वतःहून कन्फर्म सांगता येईना.
माध्यमांनी आत्तापर्यंत नेहमीच यशस्वी माध्यमांनी आत्तापर्यंत नेहमीच यशस्वी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चालविले. फक्त त्यांनाच संघाचा परस्पर पाठिंबा देऊन माध्यमे मोकळी झाली. सरप्राईज नाव म्हणून मुरलीधर मोहोळ यांचे नाव माध्यमांनी पुढे केले. एका कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहून रावसाहेब पाटील दानवे यांचे नाव चालविले. महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव समोर आणले. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि सगळ्यात लेटेस्ट म्हणून रवींद्र चव्हाण यांचे नाव माध्यमांनी पुढे आणले.
पण यापैकी कोणीही आपले नाव “कन्फर्म” केले नाही. किंवा भाजप मधल्या सूत्रांनी देखील कोणाचेच नाव “कन्फर्म” केलेले दिसले नाही. उलट मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र चव्हाण यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचा स्पष्ट खुलासा करून ते मोकळे झाले.
भाजप किंवा संघातल्या कुठल्याच सूत्रांकडून मुख्यमंत्रीपदाचे कुठलेच नाव “कन्फर्म” होत नसल्याने माध्यमांनी परस्पर नावे पुढे आणून एक एक पत्ता कापण्याचा प्रयत्न केला, असेच यातून दिसून आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App