Sanjay Shirsath : अंजली दमानियांचे बोगस आरोप, हत्या झाली तर मृतदेह कुठे आहेत? संजय शिरसाठ यांचा सवाल

Sanjay Shirsath

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sanjay Shirsath अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात. तुमच्याकडे माहिती असेल तर पोलिसांना द्या. हत्या झाली तर मृतदेह कुठे आहेत? सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. बेछूट आरोप करण्यामुळे हे सगळ बिघडत आहे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले.Sanjay Shirsath

शिरसाठ म्हणाले, आरोपींना तातडीने अटक केली जाईल. ६ एजन्सी शोध घेत आहेत. आरोपींवर कारवाई करताना कुणाचीही गैर केली जाणारं नाही.



आज पुण्यात मी आमच्या खात्यामार्फत जे हॉस्टेल चालवले जातात त्याची पाहणी केली. पुण्यात माझे समाधान झाले. सगळे नीट सूरू आहे काही त्रुटी आहेत नक्की दूर करू. पण कारभार नीट होत नसेल तर कुणाचीही गैर करणारं नाही. कारवाई होणारच. सगळया वसतिगृहाची व्यवस्था नीट करा.

भीमा कोरेगाव सोहळा दिनासाठी देखील आढावा बैठक बोलावली आहे. भीमा कोरेगाव दिनासाठी आमच्या खात्याने १४ कोटी निधी दिला आहेत .हा सोहळा चांगल्या पद्धतीने अणि शांततेत पार पाडावा यासाठी तयारी करू. प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत, असे शिरसाठ म्हणाले.

Anjali Damania making false charges, where are the bodies? Question by Sanjay Shirsath

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात