Anna Hazare : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर अण्णा हजारेंनी सोडले मौन; म्हणाले – सरकारने सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये, केंद्र सरकारला सुनावले खडे बोल

Anna Hazare

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : Anna Hazare केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. गेल्या २० दिवसांपासून या संवेदनशील विषयावर मौन बाळगून असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सरकारने वांगचुक यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये. त्यांच्या मागण्यांवर काय ते ‘हो’ किंवा ‘नाही’ असे स्पष्ट उत्तर द्यावे,” अशा कडक शब्दांत अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे.Anna Hazare

‘पीटीआय’ (PTI) वृत्तसंस्थेशी बोलताना अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाला सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले.Anna Hazare



नेमके काय म्हणाले अण्णा हजारे?

अण्णा हजारे म्हणाले, “सोनम वांगचुक उपोषण करत असताना त्यांना उचलून रुग्णालयात दाखल केले गेले. सलोख्याने प्रश्न सुटत असतात. चर्चेविना प्रश्न सुटणार नाहीत. चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. सरकारने सामंजस्याने प्रश्न सोडवावेत. बळजबरी केली तर परिस्थिती बिकट होते.”

२१ व्या दिवशी पोलिसांची कारवाई; वांगचुक उपोषणावर ठाम

शनिवारी सकाळी जंतर-मंतर आंदोलन स्थळावर एक नाट्यमय घडामोड घडली. आंदोलन सुरू होऊन २१ दिवस पूर्ण झाले असताना साध्या वेषात आलेल्या दिल्ली पोलिसांनी आंदोलकांची दिशाभूल करत सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतले आणि दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. आंदोलकांकडून सरकारच्या या पावलावर दडपशाहीचा आरोप करत तीव्र टीका होत आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतरही सोनम वांगचुक यांनी सरकारसमोर झुकण्यास नकार दिला आहे. “मी रुग्णालयातही कोणतेही अन्न किंवा औषधे घेणार नाही आणि माझ्या उपोषणावर ठाम राहीन,” असा संदेश त्यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून दिला आहे. दरम्यान, सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही आता जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले आहे. या घटनेनंतर अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली.

अण्णा हजारेंचे विधान का मानले जातेय महत्त्वाचे?

केंद्रात काँग्रेसप्रणीत सरकार सत्तास्थानी असताना, २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी दिल्लीत ऐतिहासिक आंदोलन केले होते. ११ दिवस चाललेल्या त्या उपोषणाची दखल तत्कालीन सरकारने घेतली होती आणि आंदोलकांशी सन्मानपूर्वक चर्चाही केली होती. मात्र, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे सरकारकडून सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत होता. अशा परिस्थितीत ‘अण्णा हजारे शांत का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात होता, त्यामुळे अण्णांचे हे ताजे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

Anna Hazare Breaks Silence on Sonam Wangchuk’s Protest Against Union Government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात