Motegaonkar : लातुरात मोटेगावकर क्लासेसवर सीबीआयची धाड:4 तास झडती नीट निकालानंतर जल्लोषासाठी जमले होते विद्यार्थी

Motegaonkar

विशेष प्रतिनिधी

लातूर :Motegaonkar  री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच लातूरमधील आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. मात्र सीबीआयच्या ७ सदस्यीय पथकाने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता या क्लासेसच्या कार्यालयात धाड टाकली. रात्री ९ वाजेपर्यंत पथकाने कागदपत्रांची सखोल झडती घेतली.Motegaonkar

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानंतर सीबीआयचे पथक यापूर्वी तब्बल महिनाभर लातूरमध्ये मुक्कामी होते. तेव्हा तपासादरम्यान मोटेगावकरसह प्रा.पी.व्ही.कुलकर्णी व डॉ.मनोज शिरुरे या तिघांना अटक केली होती. मात्र, री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच सीबीआयने पुन्हा लातूरकडे मोर्चा वळवला. सूत्रांनुसार, झडतीदरम्यान सीबीआयने पूर्वीची नीट परीक्षा तसेच री-नीट परीक्षा दिलेल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी, शैक्षणिक कागदपत्रे, इतर संबंधित नोंदी यांची छाननी केली. मात्र, नेमकी कोणती कागदपत्रे जप्त करण्यात आली, तपासाचा केंद्रबिंदू काय होता, याबाबत सीबीआयकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.Motegaonkar



संशयित विद्यार्थ्यांचा निकाल राखीव आणि पुन्हा झाडाझडती

पेपरफुटी प्रकरणात ज्या डॉक्टरांची चौकशी झाली होती, त्यातील काहींच्या मुलांनी नीटची परीक्षा दिलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील २ डॉक्टरांच्या मुलांचा नीटचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. हा राखीव ठेवलेला निकाल, सीबीआयची पुन्हा झाडाझडती, यांचा परस्पर संबंध असावा, अशी शक्यता शैक्षणिक क्षेत्रात वर्तवण्यात येत आहे.

CBI Raids Motegaonkar RCC Classes in Latur Following NEET Results

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात