Manmohan Singh मनमोहन सिंग यांचा अपमान करणाऱ्या नवाज शरीफ यांना मोदींनी दाखविली होती ‘औकात’

Manmohan Singh

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सप्टेंबर 2013 ची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यावेळचे पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ‘देहाती औरत’ (ग्रामीण बाई) असे संबोधले होते.मनमोहन सिंग हे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरीही, नरेंद्र मोदी यांनी बाहेरून होणाऱ्या या अपमानासमोर माजी पंतप्रधानांची बाजू उचलून धरली.
“आपल्या देशात आपण आपल्या पंतप्रधानांशी लढू, धोरणांवर वाद घालू, पण ते 125 कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. नवाज शरीफ, तुमची औकात काय आहे?” नरेंद्र मोदी यांनी त्या वेळी असे सुनावले होते.

तुम्ही माझ्या पंतप्रधानांना ‘देहाती औरत’ म्हणता आणि म्हणता की ते बराक ओबामाकडे तुमची तक्रार करतात. तेव्हा कोणता पत्रकार नवाज शरीफ यांच्याकडून मिठाई खात होता, हे मला ठाऊक नाही, पण त्याच वेळी माझ्या पंतप्रधानांचा अपमान केला जात होता,” असे मोदी म्हणाले.

संपूर्ण देशाची अपेक्षा होती की त्या पत्रकाराने नवाज शरीफ यांना ठाम विरोध करायला हवा होता आणि त्यांची मिठाई फेकून तो तिथून निघून जावा,” असा थेट आरोप नरेंद्र मोदी यांनी 2013 मध्ये केला होता.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.

Modi showed ‘aukat’ to Nawaz Sharif who insulted Manmohan Singh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात