सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!

प्रतिनिधी

नाशिक : नाशिक मध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला काहीच दिवस उरलेले असताना नव्या वादाला तोंड फुटले होते. संमेलन गीतामध्ये भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नावाचा समावेश नव्हता. त्याविषयी सावरकर प्रेमींनी प्रचंड रोष व्यक्त केल्यानंतर संमेलन आयोजकांना आता उपरती झाली आहे आणि त्यांनी संमेलन गीतामध्ये बदल करून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हुतात्मा क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांच्या नावांचा समावेश केला आहे.After the anger of Savarkar lovers, there was a change in the literary convention song of Nashik !!


WATCH : सावकरांच्या बदनामीबाबत ‘द विक’ला उपरती, लेखक मात्र मतांवर ठाम


हे नवे संपादित संमेलन गीत आता रिलीज केले असून ते संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सादर करण्यात येणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रख्यात वैज्ञानिक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नाशिक ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असून देखील त्यांच्या नाम महात्म्याकडे दुर्लक्ष करून संमेलन गीत तयार करण्यात आले होते. परंतु, सावरकर प्रेमींनी चोहोबाजूंनी टीकेची झोड उठविली. त्याचा परिणाम प्रत्यक्ष संमेलनावर होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर संमेलनकर्त्यांना उपरती झाली आणि त्यांनी संमेलन गीतामध्ये बदल करून ते नव्याने सादर केले आहे.

संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची देखील मागणी सावरकर प्रेमींनी केली आहे. साहित्य संमेलनाचा लोगो करून देखील असाच वाद झाला होता. पण लोगो बदलला नाही.

After the anger of Savarkar lovers, there was a change in the literary convention song of Nashik !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात