वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तान हा मूलतत्त्ववाद आणि दहशतवादाचे केंद्र पुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मंगळवारी जी २० राष्ट्रांच्या बैठकीत ते बोलत होते. Pm narendra modi to virtually participate in g20 leaders summit on afghan
मोदी म्हणाले, अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुढाकार घेतला पाहिजे. ठराव २५९३ वर आधारित आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची गरज आहे, असेही ते म्हणाले. अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी जी २० परिषदेचे आयोजन व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे केले होते. परिषदेतील भाषणानंतर मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अफगाण नागरिकांना मानवी दृष्टीकोनातून तातडीने मदत पुरविण्याचे आवाहन आपण केले आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App