Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाईपासून मिळाला दिलासा, किरकोळ महागाई दर 4.35 टक्क्यांवर

CPI inflation retail inflation fell in september to 4 35 percent

Retail Inflation : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाई दरापासून (सीपीआय) बराच दिलासा मिळाला आहे. या महिन्यात किरकोळ महागाई कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.35 टक्क्यांवर आली आहे. सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुख्यत्वे अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे भारतातील किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 4.35 टक्क्यांवर आली, ऑगस्ट महिन्यात हा दर 5.3 टक्के होता. CPI inflation retail inflation fell in september to 4 35 percent


प्रतिनिधी

मुंबई : सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना महागाई दरापासून (सीपीआय) बराच दिलासा मिळाला आहे. या महिन्यात किरकोळ महागाई कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.35 टक्क्यांवर आली आहे. सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुख्यत्वे अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे भारतातील किरकोळ महागाईचा दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर 4.35 टक्क्यांवर आली, ऑगस्ट महिन्यात हा दर 5.3 टक्के होता.

गतवर्षी 7.27 टक्क्यांवर होती किरकोळ महागाई

गतवर्षी 2020 मध्ये हा दर सप्टेंबर महिन्यात 7.27 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर यावर्षी सप्टेंबरमध्ये 0.68 टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) 12 ऑक्टोबर रोजी सप्टेंबरसाठी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.

अन्नधान्याच्या किमतीत घसरण

या महिन्यात, खाद्यपदार्थांच्या किमतीत घसरण झाल्यामुळे, किरकोळ महागाई दरातही घट झाली आहे. ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CFPI) जो सप्टेंबरमध्ये 0.68 टक्के होता तो सप्टेंबरमध्ये 3.11 टक्क्यांवर आला आहे.

RBIचे लक्ष महागाई कमी करण्यावर

यावर्षी आरबीआयच्या पतधोरणात सरकारचा फोकस महागाई कमी करण्यावर होता. या कारणास्तव रेपो दरात कोणतीही वाढ झाली नाही. सरकारने 2 टक्के फरकाने किरकोळ महागाई 4 टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय बँकेला दिली आहे.

आरबीआयने 2021-22 साठी सीपीआय आधारित महागाई 5.3 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 5.1 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4.5 टक्के आणि चौथ्या तिमाहीत संतुलित जोखमीसह 5.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

CPI inflation retail inflation fell in september to 4 35 percent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात