बॉलिवूडमधील बिग बॅनर प्रॉडक्शन हाऊसची मक्तेदारी संपली पाहिजे – नवाजुद्दीन सिद्दिकी

Bollywood

विशेष प्रतिनिधी

मुबंई : नुकताच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या इमी अवॉर्ड्सचे बेस्ट ऍक्टर कॅटेगरी मधील नॉमिनेशन मिळाले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘सीरियस मेन’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी त्याला हे नॉमिनेशन मिळाले आहे. त्यानिमित्त त्याने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Big Banner Production House’s monopoly in Bollywood should end: Nawazuddin Siddiqui

तो म्हणतो की, हे नॉमिनेशन मिळाल्या बद्दल निश्चितच मी आनंदात आहे. पण दिवसाच्या शेवटी कोणता चित्रपट हिट ठरला, कोणता फ्लॉप ठरला हे मॅटर नाही करत. तर मॅटर करतं की, किती स्क्रीन्सवर तुमचा चित्रपट दाखवण्यात आला आहे. एक काळ असा होता जेव्हा बिग बॅनर मूव्हीज प्रदर्शित व्हायच्या आणि देशातील  जवळजवळ 4500 स्क्रीन्सवर तो एकच चित्रपट दाखवला जायचा. तेव्हा साहजिक आहे की, हा चित्रपट हिट होणार. पण जेव्हा एखादा लो बजेट चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा त्यांना इतक्या स्क्रीन्स अव्हेलेबल होत नाहीत. त्यामुळे तो सिनेमा जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. जर अशा सिनेमांना स्क्रीन्स उपलब्ध करून दिल्या, तर आरामात ते चित्रपट 20 ते 40 कोटींची कमाई करु शकतात.


सिरीयस मेन या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दिकीला मिळाले मानाच्या आंतरराष्ट्रीय इमी अवॉर्डचे नॉमिनेशन


बिग बॅनर प्रोडक्शन हाउसच्या मक्तेदारी विरूद्ध नवाजुद्दीन सिद्दिकीने आपले अतिशय अचूक असे मत मांडले आहे.  पुढे तो म्हणतो की सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे साऊथ कोरियन आणि स्पेनच्या बऱ्याच सीरिज भारतीय प्रेक्षक आवडीने पाहताना दिसून येत आहेत. हाच कंटेट भारतामध्ये देखील बनवला जायचा. पण त्यावेळी स्क्रीन्स उपलब्ध नसायच्या. त्यामुळे तो कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही. बिग बॅनर सिनेमाची ही मक्तेदारी कमी झाली पाहिजे. असे त्यांने म्हटले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने गँग्ज ऑफ वासेपूर या सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमाने हिंदी चित्रपटसृष्टीला बरेच उत्कृष्ट कलाकार दिले आहेत. एव्हाना गंग्ज ऑफ वासेपुर हा अनुरागाच्या करियर मधील एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने बजरंगी भाईजान, मंटो, ठाकरे, रात अकेली है, सेक्रेड गेम्स, फोटोग्राफ, लंच बॉक्स अशा अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले आहेत.

Big Banner Production House’s monopoly in Bollywood should end: Nawazuddin Siddiqui

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात