THEATER’S REOPEN : नाटकाची तिसरी घंटा वाजणार ; सिनेमाचा पडदा पुन्हा गजबजणार ; अशी आहे नवी नियमावली!

  • 22 ऑक्टोबरपासून नाटकांची तिसरी घंटा वाजणार आहे .THEATER’S REOPEN: The third bell of the play will ring; The cinema screen will be buzzing again; Here are the new rules!

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र सरकारने निर्बंध हळूहळू शिथील करण्यास सुरूवात केली आहे. मंदिरं सुरू करण्यात आली आणि राज्यातल्या शाळाही सुरू करण्यात आल्या. मधे काही अवधी घेऊन टप्प्याटप्प्याने या सगळ्यावरचे निर्बंध शिथील करण्यात आले. आता थिएटर्स आणि नाट्यगृहंही सुरू केली जाणार आहेत. त्याची नियमावली सरकारने जाहीर केली आहे.THEATER’S REOPEN: The third bell of the play will ring; The cinema screen will be buzzing again; Here are the new rules!

अशी आहे नियमावली…

नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टप्लेक्स मधली जी आसन क्षमता आहे त्या आसन संख्येच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश मिळणार आहे म्हणजे उदाहरणार्थ 500 ची आसन संख्या असलेलं नाट्यगृह, सिनेमागृहं किंवा मल्टिप्लेक्स असेल तर 250 लोकांनाच प्रवेश मिळणार आहे.

सिनेमा, नाटक पाहण्यासाठी जात असताना आरोग्य सेतू अॅपवर स्वतः सेफ आहोत हे दाखवणं बंधनकारक असणार आहे.

आरोग्य सेतू अॅप नसेल तर दोन लसी घेतल्याचं प्रमाणपत्रही दाखवता येणार आहे.

फूड कोर्ट, क्लिनिंग सर्व्हिस या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचं, कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं बंधनकारक.

लसीचे दोन डोस घेऊन त्यांना कमीत कमी चौदा दिवस झालेले असणं बंधनकारक.

गर्दी टाळण्यासाठी मल्टिप्लेक्समधील सिनेमा शोच्या वेळांमध्ये तसे आवश्यक बदल कऱण्यात यावेत.

तिकीट बुक करत असताना डिजिटल पेमेंटला महत्व द्या, एवढंच नाही तर फूड कोर्टवरही डिजिटल पेमेंट करण्यासाठी आग्रही राहा
पार्किंग एरियातही गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ते उपाय योजणं बंधनकारक असणार आहे.

तसंच पार्किंगमधून मल्टिप्लेक्स, नाट्यगृहाकडे जात असताना थर्मल स्क्रिनिंग होणं आवश्यक. ज्यांचं शरीराचं तापमान नॉर्मल आहे अशांनाच प्रवेश दिला जावा.

कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, शीतपेयं सिनेमा हॉलमध्ये घेऊन जाणं, नाट्यगृहांमध्ये नेणं यावर बंदी.

विकत घेतलेले खाद्यपदार्थ पॅक केलेल्या स्वरूपात असावेत. स्क्रिनिंग हॉल किंवा नाट्यगृहाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत ते खाऊन त्यानंतर थिएटरमध्ये प्रवेश दिला जावा.

9) सगळ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं बंधनकारक

नाट्यगृहांसाठी असे आहेत नियम…

1) नाट्यगृहाचा पडदा हाताळणे, बॅकस्टेज सांभाळणारे लोक यासाठी विशिष्ट लोकच नियुक्त केले जावेत.

2) नाटकात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं मेडिकल चेकअप वेळोवेळी आवश्यक

3) ग्रीन रूमची स्वच्छता रोजच्या रोज होणं बंधनकारक

4) बॅकस्टेज, ग्रीन रूम या ठिकाणी पाहुणे भेटायला येणं, प्रेक्षागृहातील प्रेक्षक भेटणं यावर बंदी

5) नाट्यगृहाची स्वच्छता प्रत्येक वेळी केली जावी, नाट्यगृह चालवणाऱ्यांची ही मुख्य जबाबदारी असणार आहे

6) एखाद्या नाटकात बाल कलाकार असतील तर त्यांच्याकडे आरोग्य सेतू अॅप असणं ते त्यावर सेफ असणं बंधनकारक, त्यांचीही आरोग्य तपासणी करणं बंधनकार असणार आहे.

असे नियम जाहीर करून सरकारने नाट्यगृहं आणि सिनेमागृह/ मल्टिप्लेक्स सुरू करण्यास संमती दिली आहे. 22 ऑक्टोबरपासून नाटकांची तिसरी घंटा वाजणार आहे

 

THEATER’S REOPEN: The third bell of the play will ring; The cinema screen will be buzzing again; Here are the new rules!