अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात अफगाणी नागरिकांचा संताप, व्हाईट हाऊसबाहेर निदर्शने


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अफगणिस्थानमधून सैन्य माघारी घेऊन तालीबान्यांच्या हातात येथील नागरिकांना सोपविल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या विरोधात येथील अफगाणी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त नागरिकांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेणार असल्याचे जाहीर केले.Outrage among Afghans against US President Joe Biden, protests outside the White House

या घोषणेनुसार अमेरिकन सैन्याची माघार सुरू झाली. त्यानंतर तालिबानने आक्रमक होत अफगाणिस्तानच्या प्रांतांवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली. मागील काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने हाती घेतली. अमेरिकेने कोणत्याही नियोजनाशिवाय सैन्य माघारी घेतल्याने तालिबानने सत्ता हाती घेतली असल्याचा आरोप अफगाण नागरिकांनी केला आहे.



अफगाणिस्तानमधील या सत्तांतराला अमेरिकाही जबाबदार असल्याचे आंदोलक अफगाण नागरिकांनी म्हटले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणी नागरिकांचा विश्वासघात केला असल्याचे अफगाण आंदोलकांनी म्हटले. व्हाईट हाऊसबाहेर झालेल्या या आंदोलनात शेकडो अफगाण नागरिक सहभागी झाले होते.

Outrage among Afghans against US President Joe Biden, protests outside the White House

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात