विशेष प्रतिनिधी
लंडन: तालिबान राजवटीला अफगाणिस्तानचे सरकार म्हणून कोणीही द्विपक्षीय मान्यता देऊ नये, असे आवाहन ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे. याठिकाणी लवकरच नवीन प्रशासन येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.No one should recognize the Taliban regime, appeals British Prime Minister Boris Johnson
एका मुलाखतीत जॉन्सन म्हणाले, तालिबानला कोणी द्विपक्षीय मान्यता द्यावी अशी आमची इच्छा नाही. संयुक्त राष्ट्र आणि नाटोसारख्या यंत्रणांद्वारे अफगाणिस्थानच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम केले जाण्याची अपेक्षा आहे. सर्व समविचारी लोकांनी एका व्यासपीठावर येऊन अफगणिस्थान पुन्हा एकदा दहशतवादाचे केंद्र बनू नये यासाठी प्रयत्न करावेत.
तालिबानी बंडखोर रविवारी काबूलमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर अध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडला आहे. या पार्श्वभूमीवर जॉन्सन म्हणाले, बिटनचे राजदूत चोवीस तास काम करत आहेत. अफगणिस्थानमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचे अर्ज भरून घेतले जात आहेत.
अफगणिस्थान इतक्या लवकर तालिबानच्या हाती पडेल अशी अशी अपेक्षा होती का यावर जॉन्सन म्हणाले, अमेरिकेने सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोष्टी त्वरेने घडत गेल्या. यापूर्वी रशियानेही तालीबानला अधिकृत सरकार म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App