अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेनही फेसबुकवर भडकले, सोशल नेटवर्कींग कंपन्यांमुळे माणसे मरत असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेनही फेसबुकवर भडकले आहेत. सोशल नेटवर्किंग कंपन्यांमुळे माणसे मरत आहेत. अनेकजण सोशल नेटवर्किंग साईटवरील खोट्या माहितीला बळी पडतात आणि त्यात त्यांचा प्राण जातो, असे बायडेन कोरोना लसीकरणासंदभार्तील आपल्या भाषणात म्हणाले.U.S. President Joe Biden also lashed out at Facebook, accusing social networking companies of killing people

खोटी माहिती ही लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरू शकते, असे मत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर विवेक मूर्ती यांनी व्यक्त केल्यानंतर बायडेन यांनी हे वक्तव्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला खोट्या माहितीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेतील नागरिकांमध्ये विषाणूचा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव आणि त्यांचे गंभीर परिणाम हे केवळ लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात, असे मत डॉ. मूर्ती यांनी व्यक्त केले होते.बायडेन यांना पत्रकारांनी एका पत्रपरिषदेत याच संदर्भात प्रश्न विचारला. खोटी माहिती पसरवण्यासाठी वापरण्यात फेसबुकसारख्या समाजमाध्यम व्यासपीठासाठी तुमचा काही संदेश आहे का, असे राष्ट्राध्यक्षांना पत्रकारांनी विचारले. त्यावर बायडेन यांनी उत्तर देताना, ते लोकांना मारत असल्याची प्रतिक्रिया दिली. सध्या आपल्याकडे केवळ लसीकरण न झालेल्यांना साथीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचेही बायडेन म्हणाले.

दरम्यान, ज्यो बायडेन यांचे आरोप फेसबुकने फेटाळून लावले. आम्ही लोकांना वाचवण्यासाठी मदत करत आहोत. कोणतेही पुरावे नसताना आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आम्ही विचलित होणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, दोन अब्जहून अधिक लोकांनी कोरोनासंदभार्तील आणि लसीकरणाबद्दलची योग्य माहिती आमच्या माध्यमातून पाहिली आहे. इंटरनेटवर इतर कोणत्याही माध्यमावर एवढ्या लोकांनी ही माहिती पाहिली नसल्याचे फेसबुकचे प्रवक्ते लिवर म्हणाले.

U.S. President Joe Biden also lashed out at Facebook, accusing social networking companies of killing people

महत्त्वाच्या बातम्या