अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रंपही ट्विटर, फेसबुक आणि गुगलला भिडले; न्यायालयात केली याचिका दाखल


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन: ट्विटरविरोधात भारत सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. भारतातील न्यायालयांनीही ट्विटरला फटकारले आहे. आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी फेसबुक, ट्विटर आणि गुगल या कंपन्यांविरुध्द भिडले आहेत. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.President Trump also clashed with Twitter, Facebook and Google, filing a petition in court

डोनाल्ड ट्रम्प यांनी या कंपन्यांवर चुकीच्या पद्धतीने सेन्सॉर केल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडियावरील अकाउंट या कंपन्यांनी बंद केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी मियामीच्या जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली आहे.



या कंपन्यांनी माझ्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी खटला दाखल केला आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मात्र, या कंपन्यांनी त्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्याच्या प्रमुखांवरही खटला दाखल केला आहे. यामध्ये फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग, ट्विटरचे जॅक डोर्सी आणि गुगलचे सुंदर पिचई यांचा समावेश आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई आम्ही न्यायालयात लढणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या मुद्यावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील वर्षी झालेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर चिथावणीखोर वक्तव्ये आणि फेक न्यूज प्रसारीत केल्याचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला.

त्यानंतर सोशल मीडिया कंपन्यांनी ट्रम्प यांच्या अकाउंटवर कारवाई केली. ट्रम्प यांनी याआधी सोशल मीडिया कंपन्यांवर सातत्याने आरोप केले आहेत. आता कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी कोर्टात धाव घेतली आहे.

President Trump also clashed with Twitter, Facebook and Google, filing a petition in court

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात