स्मृति इराणी यांच्या महिला व बालकल्याण विभागाचा सुपोषित इंडियाचा नारा, पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण,


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सुपोषित इंडियाचा नारा देत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी सुरू केलेल्या पोषण ट्रॅकरवर दहा कोटी लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील माता आणि बालकांची काळजी घेणे शक्य झाले आहे.Smriti Irani’s Women and Child Welfare Department’s slogan for a SuPoshit India, Registration of 10 crore beneficiaries on Poshan tracker completed,

संपूर्ण देशात अंगणवाडी सेविकांचे जाळे आहे. त्यांच्या माध्यमातून महिला, गरोदर माता, बालके यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र, आजपर्यंत हे अनुदान खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हते.डिजीटल इंडियात खºया लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्मृति इराणी यांच्या कल्पनेतून मार्च २०२१ मध्या पोषण ट्रॅकर हे अ‍ॅप विकसित केले. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनही देण्यात आले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मुलांच्या जन्मापासूनच्या नोंदी ठेवते.

त्याचबरोबर गरोदर आणि स्तनदा मातांचीही माहिती भरली जाते. त्यामुळे केंद्र सरकारकडे त्यांची सर्व माहिती जाते. या माध्यमातून देशातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी स्मृति इराणी यांचा प्रयत्न आहे.

स्मृति इराणी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मार्च २०२१ मध्ये लॉँच केलेल्या पोषण ट्रॅकरवर १० कोटी लाभार्थ्यांची नोदंणी झाली आहे. आमच्या सुपोषित इंडिया प्रयत्नातील हा मोठा टप्पा आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅडमिन देशातील कुपोषणाची समस्या समजून घेऊ शकतो. लाभार्थ्यांना वेळेवर मदत पोहोचविणेही शक्य होत आहे.

Smriti Irani’s Women and Child Welfare Department’s slogan for a SuPoshit India, Registration of 10 crore beneficiaries on Poshan tracker completed,

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण