विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुंबईतील तथाकथित पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले याला दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. संयुक्त राष्ट्राच्या माजी सहाय्यक महासचिव लक्ष्मी पुरी यांच्याविरोधात अपमानजनक ट्विट केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.The so-called journalist Saket Gokhale was slammed by the high court, how can any Tom, Dick, Harry defame anyone on the internet?
कोणीही टॉम, डिक, हॅरी कोणाची इंटरनेटवरून कोणाची बदनामी कशी करू शकतो, असा सवाल न्यायालयाने केला आहे.लक्ष्मी पुरी या केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या पत्नी आहेत.
साकेत गोखले यांने १३ आणि २६ जून रोजी एक ट्विट केले होते. यामध्ये म्हटले होते की पुरी यांनी स्वित्झरलॅँडमध्ये अवैध संपत्ती खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांना त्यांचे पती हरदीप सिंह पुरी यांनी मदत केली.
यावर लक्ष्मी पुरी यांनी साकेत गोखले यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. गोखले यांनी ट्विटरवरून आपल्यावरील अपमानास्पद टिपणी हटवावी अशी मागणीही पुरी यांनी केली आहे.
पुरी यांच्या याचिकेवर न्यायालय म्हटले की कोणाचाही सन्मान राखणे हा मुलभूत अधिकार म्हणून मानला गेला आहे. न्यायालयाने गोखले यांना विचारले की ते कोणा व्यक्तीला बदनाम कसे करू शकतात. विशेषत: एखादे ट्विट जे पूर्णपणे असत्य आहे ते कसे करू शकतात?
न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांनी गोखले यांचे वकील सरीम नावेद यांना विचारले की, त्यांनी सांगावे की साकेत गोखले यांनी ट्विट करण्यापूर्वी आरोपाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फिर्यादीला फोन केला होता का? नावेद यांनी त्यावर नकारार्थी उत्तर दिले.
कायदेशिरदृष्टया याची गरज नाही. शिवाय त्यांनी एक ट्विट हे अर्थ मंत्र्यांना टॅग केले होते, असेही सांगितले. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले, याचा अर्थ तुमच्या कायदेशिर ज्ञानानुसार कोणीही टॉम, डिक आणि हॅरी कोणाबद्दलही इंटरनेवर काहीही लिहिल. त्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल याचा विचारही करणार नाही का?
पुरी यांचे वकील मनिंदर सिंह म्हणाले, साकेत यांची बातमी ही पूर्णपणे चुकीची आणि खोडसाळ होती. पुरी या सार्वजनिक जीवनात नसल्याने त्यांना प्रश्न विचारण्याचा गोखले यांना कोणताही अधिकार नाही.
त्याचबरोबर सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांच्याबाबत काही वक्तव्य करणेही चुकीचे आहे. जर त्यांना लक्ष्मी पुरी यांचा उल्लेख करायचाच होता तर अगोदर त्यांना याबाबत विचारण्याची सभ्यताही दाखवायला हवी होती.
हत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App