टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार हत्याप्रकरणी अब्दुल राशिद दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

Bombay High Court verdict in Gulshan Kumar murder case, Abdul Rashid Daud Marchent found guilty sentenced life imprisonment

Gulshan Kumar murder case : प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी अब्दुल राशीद दाउद मर्चंटला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने हत्येप्रकरणी मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश जाधव आणि न्यायाधीश बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. गुलशन कुमार हत्या प्रकरणी अब्दुल राशिद दाउद मर्चेंटला कलम 302, 307 आणि 34 अन्वये दोषी ठरविण्यात आले. कॅसेट किंग गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी हत्या झाली होती. Bombay High Court verdict in Gulshan Kumar murder case, Abdul Rashid Daud Marchent found guilty sentenced life imprisonment


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी अब्दुल राशीद दाउद मर्चंटला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने हत्येप्रकरणी मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश जाधव आणि न्यायाधीश बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. गुलशन कुमार हत्या प्रकरणी अब्दुल राशिद दाउद मर्चेंटला कलम 302, 307 आणि 34 अन्वये दोषी ठरविण्यात आले. कॅसेट किंग गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी हत्या झाली होती.

जुहूमधील जीत नगर परिसरातील घरातून बाहेर पडत असताना गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. गुलशन कुमार हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अब्दुल रउफ याने त्याची शिक्षा आणि जन्मठेप याबाबत न्यायालयात आव्हान दिले होते. ट्रायल कोर्टात निर्दोष ठरलेल्या आरोपी अब्दुल राशिद दाउद मर्चेंट याची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने त्यास दोषी ठरवले. हत्या, हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणात दोषी असलेला आरोपी अब्दुल राशिद दाउद मर्चेंट सध्या फरार आहे. कारागृहातून तो पॅरोलवर बाहेर आला होता. तेव्हापासून तो फरार झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, अब्दुल राशिद दाउद मर्चंटने एक आठवड्याच्या आत मुंबई पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणे आवश्यक आहे. जर अब्दुल राशिद दाउद मर्चंटने आत्मसमर्पण केले नाही तर त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले जाईल. तसेच त्याची रवानगी कोठडीत करण्यात येईल.

Bombay High Court verdict in Gulshan Kumar murder case, Abdul Rashid Daud Marchent found guilty sentenced life imprisonment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण