वारी पंढरीची : संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्याला 350 वारकऱ्यांना परवानगी

Pandharpur Ashadhi Wari 2021 New Rules Now 350 Warkaris permitted by Govt

Pandharpur Ashadhi Wari 2021 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे या वेळीही पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निर्बंध आहेत. वारकऱ्यांच्या मर्यादित संख्येवर आधारित परवानगी बदलण्यात आली आहे. देहूमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आणि औरंगाबादमधील पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी पूर्वी केवळ 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 350 वारकऱ्यांना हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल हा आदेश जारी करण्यात आला. Pandharpur Ashadhi Wari 2021 New Rules Now 350 Warkaris permitted by Govt


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे या वेळीही पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निर्बंध आहेत. वारकऱ्यांच्या मर्यादित संख्येवर आधारित परवानगी बदलण्यात आली आहे. देहूमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आणि औरंगाबादमधील पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी पूर्वी केवळ 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 350 वारकऱ्यांना हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल हा आदेश जारी करण्यात आला.

100 ऐवजी आता 350 वारकऱ्यांना परवानगी

त्याचबरोबर 2 जुलै रोजी प्रस्थान होणाऱ्या ज्ञानोबा माऊली पालखी सोहळ्यालादेखील 350 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी यासाठीही 100 जणांनाच परवानगी होती. या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुकाराम महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा

आषाढी वारीसाठी तुकाराम महाराज यांची पालखी आज प्रस्थान करणार असून कडक निर्बंधामध्ये हा सोहळा होईल. दुपारी 2 वाजता प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील.

उद्या एकनाथ महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा

दुसरीकडे, पैठणमधून संत एकनाथ महाराज यांची पालखी उद्या प्रस्थान करणार आहे. हा सोहळा दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. हे प्रस्थानही प्रातिनिधिक स्वरूपात असेल. पालखी जुन्या वाड्यातून समाधी मंदिरापर्यंत जाईल. त्यानंतर पालखीचं 19 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने एसटीने प्रस्थान होईल.

10 पालख्यांना परवानगी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका महाराज, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, रुक्मिणी माता, संत निळोबाराय आणि संत चंगतेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा त्यात समावेश आहे.

Pandharpur Ashadhi Wari 2021 New Rules Now 350 Warkaris permitted by Govt

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात