Lieutenant General Madhuri Kanitkar appointed as Vice Chancellor of the University of Health Sciences Nashik by Governor Koshiyari

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Lieutenant General Madhuri Kanitkar :  लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Health Sciences University) नव्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही घोषणा केली आहे. Lieutenant General Madhuri Kanitkar appointed as Vice Chancellor of the University of Health Sciences Nashik by Governor Koshiyari


विशेष प्रतिनिधी

नाशिक : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Health Sciences University) नव्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही घोषणा केली आहे.

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (AFMC) पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली आहे. बालरोगशास्त्र या विषयात त्या एमडी आहेत. दिल्लीतील AIIMS मधून त्यांनी बालरोगशास्त्रात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं.

लेफ्टनंट जनरल ही श्रेणी लष्करातील दोन नंबरची सर्वांत मोठी श्रेणी मानली जाते. त्यानंतर जनरल ही श्रेणी असते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे जनरल आहेत. डॉ. माधुरी कानिटकर यांना लेफ्टनंट जनरल ही श्रेणी देण्यात आली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या उप-प्रमुख पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या अधिकारी ठरल्या होत्या. लष्करात विविध पदांवर त्यांनी 37 वर्षं काम केलं आहे. त्यांचे पती राजीव हे भारतीय सैन्यातून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झाले आहेत. या पदापर्यंत पोहोचलेलं कानिटकर दांपत्य देशातलं पहिलं दांपत्य ठरलं आहे.

Lieutenant General Madhuri Kanitkar appointed as Vice Chancellor of the University of Health Sciences Nashik by Governor Koshiyari

महत्त्वाच्या बातम्या