Tokyo state Emergency : 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जपानची राजधानी टोकियो येथून मोठी बातमी समोर येत आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या आणीबाणीच्या परिस्थितीतच ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल. याचा अर्थ असा आहे की, आता ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात हजर राहण्याची परवानगी मिळणार नाही. Tokyo state Emergency declared in Tokyo 2 weeks before start of Olympics games
वृत्तसंस्था
टोकियो : 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जपानची राजधानी टोकियो येथून मोठी बातमी समोर येत आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या आणीबाणीच्या परिस्थितीतच ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल. याचा अर्थ असा आहे की, आता ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात हजर राहण्याची परवानगी मिळणार नाही.
बुधवारी सायंकाळपासून जपानची राजधानी टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी जाहीर केले की, 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियो शहरात आणीबाणीची स्थिती लागू होईल. यापूर्वी बुधवारी तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी येत्या सोमवार ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता.
23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये ऑलिम्पिक खेळ होणार आहेत. यापूर्वीच मैदानात परदेशी प्रेक्षकांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण आता आणीबाणी लागू झाल्यानंतर टोकयोतील स्थानिकही मैदानात जाऊन ऑलिम्पिक खेळ पाहण्याची शक्यता संपली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून टोकियोमध्ये कोरोना संसर्गात वाढीची नोंद होत आहे. गुरुवारी, टोकियोमध्ये कोरोनाचे 896 रुग्ण आढळले. यापूर्वी बुधवारी टोकियोमध्ये कोरोनाचे 920 रुग्ण आढळले होते. 13 मे नंतर एकाच दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे.
गेल्या 19 दिवसांपासून टोकियोमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात टोकियोमध्ये दररोज सरासरी 663 रुग्ण आढळले आहेत, जे या आठवड्यात दररोजच्या सरासरी 523 पेक्षा जास्त आहे. इतकेच नाही तर बुधवारी टोकियोमध्ये कोरोना विषाणूमुळे दोन मृत्यूही झाले आहेत.
संपूर्ण देशाचा विचार केला तर जपानमध्ये बुधवारी कोरोनाचे 2,191 रुग्ण नोंदवण्यात आले. 10 जूननंतर देशात एका दिवसात 2000 पेक्षा जास्त रुग्णांची पहिल्यांदाच नोंद झाली आहे. यावरून तिथे संसर्गात हळूहळू वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Tokyo state Emergency declared in Tokyo 2 weeks before start of Olympics games
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App